नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट

नोकरी मिळवताना १ )  जॉब कन्सल्टन्ट

नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा  वॉटरमार्क असेल. )

जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च  कन्सल्टन्ट

नोकरी मिळवून देण्याचे काम आजकाल जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च  कन्सल्टन्ट कडून केले जाते . इतरही काही शब्द आहेत . आपण याला  कन्सल्टन्ट असा शब्द वापरूया. या व्यवसाया  विषयी आणि या लोका  विषयी बरेच गैरसमज झाले आहेत आणि पसरवले जात आहेत . मी स्वात: या क्षेत्रात ३ काम वर्षे केले असल्याने या विषया  वरून सुरुवात करीत आहे .

कोठल्याही कम्पनी मध्ये नोकरी देण्याची एक प्रक्रिया असते .
१) वेगवेगळी खाती ( डिपार्टमेंट्स ) कोणत्या माणसांची कोणत्या पदावर गरज आहे हे शोधतात
२) गरज हि वेवेगवेगळ्या  कारणाने निर्माण होते - माणसे निवृत्त होतात , सोडून जातात, मरण पावतात किंवा वाढणाऱ्या कंपनीला अधिक माणसांची गरज लागते . लेखक - हेमंत वाघे 
३) हि गरज वरिष्ठ अधिकारी मान्य करतात आणि ती नंतर मानव संसाधन ( Human Resources - HR ) डिपार्टमेंट कडे जाते . काही ठिकाणी या खात्या अंतर्गत रिक्रुटमेंट डिपार्टमेंट हि असते,

आता  पुढची कामे - जसे कि जाहिरात देणे , रिस्युमे  मागवणे , किंवा आधी असलेल्या प्रोफाइल बघणे , उमेदवार बोलावणे , मुलाखत ,एखादवेळी परीक्षा , पुढील मुलाखत , आणि मग योग्य उमेदवार मिळाला कि नोकरी ची ऑफर , त्या उमेदवाराने ऑफर नाकारली तर दुसऱ्या वेटलिस्ट मध्ये असलेल्या उमेदवारासाठी हीच प्रक्रिया ..

आता वाचायला हे सोपे वाटले तर हाच विचार येतो कि कम्पनी कडे एव्हडे एच आर किंवा रिक्रुटमेंट डिपार्टमेंट असताना  जॉब कन्सल्टन्ट कडे का जातात ?

पूर्वी निदान हे  कन्सल्टन्ट कमी होते , आणि ते स्वतःचा कॅन्डीडेट डेटाबेस तरी बनवून ठेवायचे .
मग नोकरी डॉट कॉम आणि इतर जॉब साईट आल्या आणि पैसे देऊन प्रचंड डेटाबेस बघायला मिळू लागला. ( ३ दिवस - १५० रिस्युम ला नोकरी ६५०० रुपये आकारते ) लिंकेडीन वर मिळाले तर अनेक प्रोफाइल फुकटात मिळू लागल्या . ( लिंकेडीन वर हि पैसे देऊन प्रोफेशनल सर्व्हिस आहे )  लेखक - हेमंत वाघे 

मग या  जॉब कन्सल्टन्ट ची गरज ?

१) हे कन्सल्टन्ट हे प्रोफेशनल असतात , हेच काम सतत करीत असल्याने ते अनेक प्रकारच्या प्रोफाइल शोधण्यात अति तज्ञ् झाले असतात .
२) अजून हि  कन्सल्टन्ट स्वतचे डेटाबेस बनवतात , आणि तो विविध प्रकारे त्याचे अनालिसिस करून ठेवतात.
३) आज काळ नोकरी डॉट कॉम वर सध्या नोकरीच्या साठी उमेदवार शोधले तर हजारो प्रोफाइल मिळू शकतात , यात अनेक उमेदवार हे पूर्णतः त्या कामासाठी निरुपयोगी असू शकतात . त्यामुळे सुरुवातीची चाळणी हे अतिशय किचकट आणि कंटाळवाणे काम असते . एक्सपर्ट सर्च , स्मार्ट सर्च करून योग्य कॅन्डीडेट मिळू शकतात. तरी मी मिळालेल्या अनेक प्रोफाइल ला चाळणी लावावी लागते . लेखक - हेमंत वाघे
३) मग त्या लोकांना फोन / मेल करून त्यांना नोकरी पाहिजे का ते बघावे लागते . अनेकदा फोन करून त्यांना कम्पनी बद्दल माहिती द्यावी  लागते - ती नोकरी " विकावी " लागते . आणि मग त्यांचा नवीन रिस्युम मागवून तपासावा लागतो
४) मग अजून एक चाळणी लावून यादी कम्पनीला दिली जाते .
५) नन्तर इंटरव्हू चे को ऑर्डिनेशन  करणे  , वेगवेगळ्या  इंटरव्हू  लेव्हल   कॅन्डीडेट  ला अपडेट करणे , आणि या प्रक्रियेतील इतर अनेक कामे  कन्सल्टन्ट करतात .

कन्सल्टन्ट यासाठी फी सर्वसाधारण जागा साठी १ महिन्याचा पगार -८.३३ टक्के किंवा त्यापेक्षा थोडी कमी असू शकते . हल्ली या पेक्षा कमी फी त  हि काम केलेजते . तसेच नोकरी लागलेल्या   कॅन्डीडेट ची ३ ते ६ महिन्याची  ग्यारेंटि असते . तो सोडून गेला तर दुसरा देण्यास मदत करावी लागते !
हे खूप ढोबळ मानाने लिहिले आहे . अजून हि अनेक सेवा यात दिल्या जातात.

सिनिअर पोस्ट  ला गुंतागुंत जास्त असल्याने फी जास्त असते.   CEO किंवा डायरेक्टर  किंवा व्हाईस प्रेसिडेंट अशा पद साठी ती २० ते ३० टक्के हि जाऊ शकते . अनेकदा या कामासाठी वेगळे स्पेशालिटी  कन्सल्टन्ट असतात आणि ते एका वेळी फार कमी असाइनमेंट वर काम करीत असतात. प्रचंड पगारामुळे कमी असाइनमेंट मध्ये फी पण बक्कळ मिळू शकते .

आता लक्षात आले असेल कि अनेक कम्पनित  कन्सल्टन्ट ला टाळून जाऊ शकत नाही . काही वेळा कम्पनी ने प्रमाणित केले असेल तर कम्पनी साठी  कन्सल्टन्ट च जाहिरात हि देतात .

तसेच अनेक वेळा
१)  कन्सल्टन्ट रेस्युमे सुधारून देतात . नवीन कसा लिहावा ते सांगतात.
२) जर उमेदवार  ( candidate ) जर प्लेस होण्यासारखा  असेल तर काही कन्सल्टन्ट  बोलावून इंटरव्हू  तयारी हि  करून घेतात
३) काही वेळा  कन्सल्टन्ट चांगला करिअर सल्ला देऊ शकतात .  लेखक - हेमंत वाघे
४)  कन्सल्टन्ट रेस्युम ठेवून घेतात . चांगला रॅपो असेल तर एकदा बोलल्या नन्तर काही काळाने जॉब चा कॉल आल्याची अनेक उदाहरणे आहेत .

आज काळ डॉकटर प्रमाणे कन्सल्टन्ट हि स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट बनू लागले आहेत . अनेक जण फक्त ठराविक इंडस्ट्री च सांभाळतात . फक्त आय टी साठी काही आहेत आणि काही जण तर आय टी मधील विशिष्ट कसेतरी जसे कि सॅप वर च काम करणारे आहेत . फक्त सिनिअर जागा त्या पण विशिष्ठ इंडस्ट्री तीळ बघणारे पण आहेत ( मी अशाच एका  कन्सल्टन्ट  कडे काम केले होते)  लेखक - हेमंत वाघे

आता सर्वात महत्वाचा प्रश्न -  उमेदवारासाठी कन्सल्टन्ट ची फी किती असते ? काय खर्च येतो ?
शून्य - काहीही नाही.

माहितीतील चांगले कन्सल्टन्ट उमेदवाराकडून काहीही फी घेत नव्हते . सर्व फी ते कंपनी कडून घेतात .

आता काही लोक टोकन फी , रजिस्टरेशन फी म्हणून काही रक्कम घेतात - खरे तर ती  हि देवू नये . शेकडो फुकट काम करणारे  कन्सल्टन्ट आहेत.
तर जे नोकरी शोधात आहेत त्यांना चांगल्या कन्सल्टन्ट च फोन येवो आणि चांगली नोकरी मिळो !  लेखक - हेमंत वाघे

पुढील भागात नोकरी शोधण्यातील अनेक विषयावर लिहिण्याचा इरादा आहे . तरी आपल्याला काय पाहिजे ते लिहा . आशा आहे कि मी काही तरी उपयोगाचे लिहीन.

धन्यवाद
हेमंत वाघे
hemantwaghe@gmail.com

Comments